Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeChandrapurनुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा

नुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा

शिवसेना उ.बा.ठा गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांची मागणी

मूल :- चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आवकाळी पाऊस पडला यात तालुक्यातील शेतमालाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे राज्य शासनाने सोयाबीन,कापून धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत माहिती घेण्यासाठी महसूल भागात मोका चौकशी करून नुकसानीचा अहवाल बनवला जात आहे.यात धान पीक सोडल्याने यात धान पीक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे , आवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला आहे. आता धान पीक कापणीला आला आहे काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे,धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो.आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पीकाला नुकसान केला आहे ,त्यामुळे सोयाबीन कापूस कडधान्य पीक नुकसानच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मोका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय यांना तहसीलदार मार्फत आज दि.,,२८/१२/२०२३ रोजी निवेदन देण्यात आला. आपला मुल तालुका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने त्याचे नुकसान झाले तर कुटुबाला साभाळणे अडचणीचे होते,आपण या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतक-याना नुकसान लवकारत लवकर भरपाई मिळवून दयावी.करिता निवेदन देन्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख आकाश अजय राम,रितिक संगमवार युवासेना तालुका प्रमुख,सुनील काले,महेश चौधरी,गीतेश घोड़े शाखा प्रमुख.मुकेश गांडलेवार,यश संगमवार,वैभव भांडेकर,दादाजी लोडेलीवार, तोहीद शेख,सोहेब खान,सौरव राऊत,प्रमोद बोप्पवार,सौरभ गिरड़कर,ईश्वर कुसराम.मनोज बोप्पावार आदि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!