Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeChandrapurबोरचांदलीत नाल्याच्या पाण्याने शेतीचे नुकसान

बोरचांदलीत नाल्याच्या पाण्याने शेतीचे नुकसान

पोलीस पाटलांनी केली पाहणी

गुलशन लाकडे
मूल : पंधरा दिवसाची उसंत घेतल्यानंतर दोन दिवसांपासून पाण्याची रिपरिप तालुक्यात सुरू झाल्याने नदी नाल्याकाठा वरील शेत पाण्याखाली येऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामतः शेतीचे पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
मुल तालुक्यातील बोरचांदली येथील संदीप रामीडवार व प्रकाश गुंठावर या शेतकऱ्यांचे धान पीक पूर्णता पाण्याखाली येऊन शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी बी बियाणे महागडे कीटकनाशके घेऊन रोवणी चा खर्च करीत रोवणी पूर्ण केले. मात्र रोवणी झाल्या बरोबरच शेतात पाणी आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
सदर शेतीची पाहणी बोरचांदली येतील पोलीस पाटील दशरथ मडावी यांनी केली असून प्रशासनाला माहिती दिली आहे. प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!