Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedअवकाळी वादळात घराची पत्रे उडाली

अवकाळी वादळात घराची पत्रे उडाली

घरसंसार उघड्यावर

सुशांत वाकडे

मूल : तालुक्यातील चिरोली परिसरात आज सोमवारला दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.
चिरोली जवळील टोलेवाही येथील कासुबाई गध्देकार या महिलेच्या घराचे टीन वादळाने उडून बाजूला पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. यावेळी कासुबाई घरात होत्या. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
सोमवारला झालेल्या या वादळाने चिरोली परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असल्याने तालुका प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिलेसह ग्रामस्थांनी केली आहे.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!