Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeChandrapurभेजगाव येथे सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पाचे उद्घाटन

भेजगाव येथे सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पाचे उद्घाटन

किसान महिला समूहाचे आयोजन


प्रतिनिधी – गुलशन लाकडे
मूल – महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आत्मनिर्भरता यावे म्हणून उमेद च्या माध्यमातून गावागावात रोजगार व विविध उपक्रम राबविल्या जात आहेत.
मुल तालुक्यातील भेजगाव येथे किसान स्थानिक महिला समूहाच्या वतीने सेंद्रिय निविष्ठा गांडूळ खत प्रकल्प महिलांनी उभारला असून या प्रकल्पाचे मंगळवार ला उद्घाटन पार पडले.
सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून माजी सभापती प्रकाश गांगरेड्डिवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग समन्वयक अमर रंगारी, कृषी व्यवस्थापक रुपेश आदे, जाधव, मयूर गडमवार, माझी सरपंच रज्जू ताई शेंडे अंगणवाडी, सेविका निमाताई शेंडे, छबुताई तेल्लावार, कृती संगम सखी गीता चलाख, समता ग्राम संघाचे अध्यक्ष शुभांगी गणवीर एकता ग्राम संघाचे अध्यक्ष भारती मोहुर्ले आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी जागतिक महिला दिनाच्या उच्च साधून महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यात महिलांनी विविध स्पर्धा सहभाग नोंदवीत अंगी असलेल्या सूक्तकला गुण सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा उराडे तर यशस्वी संचालन सारिका बावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नम्रता चटारे, सुनीता तेलावर, शरयू वाढई, रूपाली गांगरेड्डीवार, कमल सोयाम, निशा भोयर, इंदुबाई गणवीर आदि महिलांसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!