Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeChandrapurग्रामपंचायत सदस्यांच्या सतर्कतेने बोगस नेत्र शिबिराचा डाव फसला

ग्रामपंचायत सदस्यांच्या सतर्कतेने बोगस नेत्र शिबिराचा डाव फसला

गडिसुर्ला येथील प्रकार , अप्रशिक्षितांकडून होत होती तपासणी

बंडू अल्लीवार

मुल : तालुक्यातील गडिसुर्ला येथे चंद्रपूर येथील सारखी फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी गावात दवंडी देऊन सरपंचांच्या परवानगिने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येत होते. व या शिबिरात रुग्णांकडनं 600 रुपये घेऊन त्यांना चष्मे वितरित केल्या जाणार होते. यावेळी जवळपास दहा रुग्णांची तपासणी करून चष्मे घेण्याकरिता नोंद केली गेली. मात्र ही बाब येथील ग्रामपंचायत सदस्य प्रीतम आकुलवार यांना माहीत होताच सदर संस्थेची माहिती व तपासणी केल्याने व सदर शिबिरात एकही प्रशिक्षित नेत्र तज्ञ नसल्याची बाब समोर आल्याने सारखी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना शिबिर बंद करून तिथून काढता पाय घ्यावा लागला.
डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवाच्या बाबतीत खोटी माहिती देऊन शिबिराच्या नावाखाली ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संस्थेची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रीतम आकुलवार यांनी केली आहे.
शिबिर आयोजकांचे चंद्रपूर येथे ऑप्टिकलचे दुकान असुन मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या नावाखाली 600 रुपयांत बोगस चष्मे देत नागरीकांची दिशाभूल करत असल्याची बाब पुढे आली आहे.
या संस्थेच्या वतीने रुग्णांना दिलेल्या चिठ्ठीवर नेत्र तज्ञ म्हणून कल्पना मांडळे व मयूर मिसाळ यांची नावे असले तरी प्रत्यक्षात या लोकांनी शिबीरात उपस्थित राहत नसल्याने संबंधित संस्थेची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी ग्रा.पं. सदस्य प्रितम आकुलवार यांनी केली आहे.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!