Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedआदर्श गावाची संकल्पना राबविणार

आदर्श गावाची संकल्पना राबविणार

सरपंच रवींद्र कांमडी कोसंबी

मूल– उच्चशिक्षित होऊन चांगली नोकरी करीत असतानाच ग्रामविकासाची ओढ स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे नोकरी करीत असतानाच सण 2010 व 2015 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहभाग नोंदविला आणि विजय मिळवत सदस्य पदाची दहा वर्षे पूर्ण केले त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
घरात राजकीय कोणताही वारसा नसला तरी 2021 रोजी झालेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखविल्याने सरपंच पदावर आरोप होता होत प्रत्यक्ष ग्रामविकासाला सुरुवात केली त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आहे गावात आदर्श गावाची संकल्पना राबविणार असून राज्यस्तरावर कोसंबी गावची वेगळी ओळख निर्माण करणार आहे.
ग्राम विकासाची किंवा कोणतेही कल्पक व तितकेच प्रभावी लोकहिताचे कार्य करण्यासाठी सत्ता हे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे त्यामुळे आपण सरपंच होऊन गावाला विकासाच्या प्रवाहात आणल्याचे समाधान मिळेल मी विलेज डेव्हलपमेंट प्लान तयार केला असून तो प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली आहे.
एम ए, बीएड, एम एड पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुल तालुक्यातील कोसंबी चे सरपंच रवींद्र कांमडी यांनी येथे सहा वर्षे ज्युनिअर कॉलेजला दोन वर्षे हायस्कूल शाळेवरती दोन वर्षे नोकरी केली आहे. सरपंच रवींद्र कांबळी उच्चशिक्षित असल्याने स्वतः पुढाकार घेत
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, पुरस्कार मिळाला,
तालुका स्तरीय प्रथम, जिल्हा स्तरीय दुसरा
विभाग स्तरीय तिसरा
आर,आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा.
तालुका स्तरीय प्रथम,जिल्हा स्तरीय दुसरा मिळविला आहे.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.अनेक गावातील लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देत आहेत.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!